
गोंधळ, कथ्यक नृत्य, भरतनाट्यम व सुरेल गीताच्या कार्यक्रमाने वेधले लक्ष…
अमळनेर:- येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमात रंगतदार कार्यक्रमांनी मोठी धम्माल केली,यावेळी गोंधळ नृत्य, कथ्यक नृत्य,भरत नाट्यम व सुरेल गीताच्या कार्यक्रम अतिशय सुंदर झाल्याने या कार्यक्रमानी साऱ्यांचेच लक्ष वेधले.
प्रताप महाविद्यालयातील बालकवी ठोंबरे सभागृहात
दि 29 ला जळगांवच्या आर्या शेंदूर्णीकर यांनी बहिणाबाईंची कविता – माझी माय सरसोती, “अगं नाच नाच नाच राधे उडवू या रंग”.”श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली” अवघे गर्जे पंढरपूर” या गीतांवर सुंदर कथक नृत्य सादर केले.यानंतर सुरेल गीतांचा कार्यक्रम “मराठी पाऊल पडती पुढे” सादर करण्यात आला.
तर दि 30 रोजी नयना कुलकर्णी व रुपाली राजपूत समूहाने “आमची माती आमची संस्कृती”वर आधारित गोंधळ, गीतावर सुंदर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.तसेच धनगर नृत्य, मंगळागौर, लेझीम, वासुदेव आदी नृत्यही बहारदार झाली.यानंतर बालचंद्रन नारायणन चेन्नरा यांचे मार्गदर्शनात कानुश्री संगीत विद्यालयाच्या मुलींनी भरतनाट्यम नृत्य सादर केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचलन संदीप घोरपडे यांनी केले.
अमळनेर महिला मंचने ” सूर तेच छेडता”- या अंतर्गत
पूर्वा कुलकर्णी, सौ मनीषा भांडारकर, शुभांगी खंडाळे, राजश्री पाटील, सरोज देसाई यांनी अप्रतिम मराठी गीते गायली. त्यांना किशोर देशपांडे (कीबोर्ड), नितीन गुरव (ढोलकी),देवांशु(तबला),विजय शुक्ल (कोंगो), कार्तिक गुरव (ऑक्टोपँड) यांची साथ लाभली. सोनार महिला मंडळाने रामधूनवर नृत्य सादर केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पूजा शहा व करुणा सोनार यांनी केले.




