तालुक्यातील दोघांची सहा. फौजदार तर चौघांची हवालदारपदी झाली पदोन्नती…
अमळनेर:- जिल्हा पोलिस दलात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, खुला आदी प्रवर्गनिहाय आरक्षण विचारात घेऊन पदोन्नतीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक एस राजकुमार यांनी दिल्याने जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात कार्यरत ३२ हवालदारांना पोलिस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असून पोलिस नाईक असलेल्या ३२ पोलिस कर्मचाऱ्यांना हवालदार पदी पदोन्नती मिळाली. अशा एकूण ६४ पोलिस कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गत पदोन्नतीने बढती प्राप्त झाली.
अमळनेर तालुक्यातील मारवडच्या आदर्श पोलिस ठाण्यातील चार पोलिस हवालदारांपैकी फिरोज जैनोद्दीन बागवान व अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील मेघराज श्यामराव महाजन या दाेघांना सहाय्यक फौजदार (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक) पदी पदोन्नतीने बढती मिळाली. तर मारवड पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक सुनील विश्वास तेली, मुकेश तापीराम साळुंखे, धनंजय प्रकाश देसले व अमळनेर पोलिस ठाण्यातील सूर्यकांत रघुनाथ साळुंखे या चार जणांना पदोन्नतीने पाेलिस हवालदार पदी बढती मिळाली आहे. बढती प्राप्त पोलिस कर्मचाऱ्यांना बहुप्रतीक्षित पदोन्नती आदेश प्रत्येक पोलिस ठाण्यास प्राप्त झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.