
कलानंद बालमेळावा ठरणार ऐतिहासिक, बाल मंडळीमध्ये उत्सुकता…
अमळनेर:- येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाआधी आज दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजे दरम्यान कलानंद बालमेळावा,सानेगुरुजी साहित्य नगरी अमळनेर येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने बाल साहित्यिक आज साहित्य संमेलनाच्या मंचावर अवतरणार आहेत.
या बालमेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी बालकांनी प्रचंड मेहनत घेतली या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. बाल मेळाव्याची जबाबदारी ज्या विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्या मुला-मुलींनी संपूर्ण तयारी केली आहे.आज दि. १ फेब्रुवारीला बालमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या बालमेळाव्याचे अध्यक्षस्थान तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगांवचा विद्यार्थी शुभम सतीश देशमुख भुषविणार आहे. बाल मेळाव्याचे उद्घाटन रावसाहेब रुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जळगावची विद्यार्थीनी पियुषा गिरीष जाधव हिच्या हस्ते होईल. तर बाल स्वागताध्यक्ष पद डि. आर. कन्या हायस्कूल, अमळनेरची विद्यार्थीनी दिक्षा राजरत्न सरदार भुषविणार आहे. बालमेळाव्यात शालेय विद्यार्थी काव्यवाचन, समुहगीत, नाट्यछटा, कथाकथन आदि कलाविष्कार सादर करणार आहेत.
बाल मेळाव्यासाठी मंच व्यवस्थापन, कथाकथन, काव्यवाचन नाट्यप्रवेश आदींसाठी विविध विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. बाल मेळावा समितीचे सदस्य संदीप घोरपडे, प्रा.प्रकाश धर्माधिकारी, गिरीश चौक, वसुंधरा लांडगे, मिलिंद पाटील, भाऊसाहेब देशमुख, ॲड. सारांश सोनार, ॲड. कौस्तुभ पाटील, प्रा.पी.जे. जोशी, भैय्यासाहेब मगर,स्नेहा एकतारे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले आहे.
विद्यार्थीच सांभाळणार सर्व कामांच्या जबाबदाऱ्या…
बालमेळाव्यात सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थीच सांभाळणार आहेत. यात सुत्रसंचालन भाविका वाल्हे, निधी पवार, समृध्दीराजे पाटील, आकांक्षा पाटील, नेहा पाटील, प्रास्ताविक – डॅफोडील सोनवणे, मृणाल पवार, अजिंक्य सोनवणे, रिचल पाटील, अतिथी परिचय : जिगाशा महाजन, हिमांशू राजपूत, मृणाल पाटील, देवयानी साळूंखे, आभार प्रदर्शन : जिज्ञासा पाटील, कृष्णा पवार, मनस्वी पाटील, नेहा पाटील, सुमित पाटील तसेच अश्विनी पाटील, मानव पाटील, लोकेश पाटील, संजना नेरकर, तनय पाटील, कृतिका साळूंखे यांच्याकडे व्यासपीठ व्यवस्थापन जबाबदारी सोपविण्यात आली आहे.




