
अमळनेर:- गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेचा जिल्ह्यातील निकाल नुकताच जाहीर झाला. गांधी विचार संस्कार परीक्षेत कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील कु. नाजमीन पठाण या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
सदर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम कस्तुरबा सभागृह, गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव येथे दिनांक. 27 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता.
माजी शिक्षणाधिकारी नीलकंठ गायकवाड, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबईचे अध्यक्ष जे.के .पाटील, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सौ.अंबिका जैन, डॉ, गीता धर्मपाल, डॉ .अश्विन झाला, वरिष्ठ गांधीयन अब्दुलभाई व परीक्षा नियंत्रक गिरीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ पार पडला. सोबत महाविद्यालयाचे गांधी विचार संस्कार परीक्षेचे समन्वयक प्रा. डॉ. सतीश पारधी उपस्थित होते त्यांचे व कु. नाजमीन पठाण हिचे ग्राम विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सेक्रेटरी, सर्व संचालक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.




