
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे गोवर्धन येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक ६ फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता विनोद बोरसे (माजी सैनिक, पोलीस पाटील सात्री) यांच्या हस्ते होणार आहे .प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक डॉ. सचिन नांद्रे (संचालक कबचौ उमवी जळगाव) तसेच प्राध्यापक डॉ. दिलीप गिहे ( विभागीय समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना कबचै उमवी जळगाव )आणि सुनील डी. नंदवाळकर (डीवायएसपी) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच संस्थेचे संचालक मंडळ, परिसरातील प्रमुख मान्यवर यांची उपस्थिती लाभणार आहे.
यानंतर बौद्धिक प्रबोधन ही होणार आहेत. यात दिनांक ६ मंगळवार रोजी मतदान जनजागृती, दिनांक ७ बुधवार रोजी शाश्वत विकास आपत्ती व्यवस्थापन, दिनांक ८ गुरुवार रोजी मोबाईलचे दुष्परिणाम, महिलांचे आरोग्य, दिनांक ९ शुक्रवार रोजी माझी वसुंधरा, व्यक्तिमत्व विकास, दिनांक १० शनिवार रोजी पंचप्राण, दिनांक ११ रोजी पाणी व्यवस्थापन, पोक्सा कायदा, दिनांक १२ रोजी विद्यार्थ्यांचे मनोगते होतील. सदर शिबिरास महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित राहणार आहेत.

