
अमळनेर:- नुकत्याच जाहिर झालेल्या युजीसी नेट परीक्षेच्या निकालात अमळनेर तालुक्यातील अंबारे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचे शिक्षक प्रदीप रावण कंखरे हे मराठी हा मुख्य विषय घेऊन ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
विशेष म्हणजे राज्यात ओबीसी संवर्गात केवळ 78 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात कंखरे यांचा समावेश आहे.कंखरे हे शिक्षक असून विद्यार्थी हितासाठी तथा गोरगरीब विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड सुरू असते, यापूर्वी देखील त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात विविध ठिकाणी प्राविण्य मिळविले असून आता थेट अत्यंत कठीण असलेली नेट परीक्षाच त्यांनी उत्तीर्ण करून दाखविल्याने शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे विशेष कौतुक होत आहे. वंदेमातरम् युवा मंच, जी एस.हायस्कुल गृप अमळनेरच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.




