अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे गोवर्धन येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे
उद्घाटन माजी सैनिक विनोद बोरसे (पोलीस पाटील, सात्री) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ. सचिनजी नांद्रे (संचालक कबचौ उमवी जळगाव) तसेच प्राध्यापक डॉ. दिलीप गिहे ( विभागीय समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना कबचै उमवी जळगाव )आणि डीवायएसपी सुनील डी. नंदवाळकर, एपीआय शितलकुमार नाईक आदी मान्यवर तसेच परिसरातील प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. सदर शिबिरास महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.