अमळनेर:- खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्यकारणीवर प्रताप महाविद्यालयतील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील कायम प्राध्यापकांमधून दरवर्षी एका प्राध्यापकाची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात येते परतु यावर्षी एकमत न झाल्याने उपप्राचार्य प्रा. पराग पाटील व प्रा.डॉ. विजय तुंटे यांच्यात चुरशीची लढत झाली. या चुरशीच्या लढाईत प्रा.पराग पाटील विजयी झाले.
सदर निवडीचे पत्र महाविद्यालयाचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ. ए. बी. जैन व निवडणूक निर्णय अधिकारी उपप्राचार्य प्रा. डॉ.जी.एच.निकुंभ यांनी दिले.
याप्रसंगी स्थानिक निवड समिती सदस्य उपप्राचार्य प्रा.डॉ.जे.बी. पटवर्धन, प्रा.डॉ.नलिनी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.यू.जी.मोरे, डी.बी. कांबळे, जे.एन.पाटील यांनी काम पाहिले तसेच राकेश निळे, भटू चौधरी, विजय ठाकरे, अजय साटोटे, उमाकांत ठाकूर यांचे निवडणूक कामी सहकार्य लाभले.
या निवडीचे खा.शि.मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्याध्यक्ष, कार्यापाध्यक्ष,संचालक मंडळ, प्राचार्य, उपप्राचार्य,पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.