
अमळनेर:- तालुक्यातील तरवाडे येथे किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण केल्याने मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १४ रोजी सकाळी तरवाडे येथील फिर्यादी नाना सजन पाटील (वय-६५) यांच्या शेतातून जितेंद्र धनराज पाटील याने दादरचे खोंडे फिर्यादीस न विचारता कापुन आणले होते. त्याबाबत फिर्यादीने विचारणा केली असता त्याचा राग आल्याने रेखाबाई धनराज पाटील ही फिर्यादीस व त्याची सुनबाई रंजनाबाई हिला देखील शिवीगाळ करु लागली. त्यावेळी शेजारीच उभा असलेला जितेंद्र धनराज पाटील हा बोलला की, मी तुझ्या शेतातील सर्वच दादरचे खोंडे कापुन टाकेन तुला काय करायचे आहे ते करुन घे, तु आमच्या नांदी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असे बोलुन त्याने त्याच्या हातातील लाकडी काठीने फिर्यादीच्या कपाळाला व उजव्या डोळयाला तसेच डाव्या हाताला मारहाण करुन दुखापत केली. त्यावेळेस भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादीचा लहान मुलगा जितेंद्र पाटील हा लागलीच पळत येवुन भांडणाची आवरा आवर करुन लागल्यावर आरोपीने त्याच्या हातातील लाकडी काठीने त्याला कपाळाला व डाव्या हाताला मारहाण करुन दुखापत केली. त्यावेळी गांवातील लोकांनी येवू सोडवणुक केली. याबाबत मारवड पोलिसांत भादवि कलम 324, 323, 504, 506 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मपोहेका रेखा भरत ईशी ह्या करीत आहेत.





