
अमळनेर :- तालुक्यातील तासखेडा येथे दि.१९ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा परिषद व अमळनेर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पशु प्रदर्शन व प्रचार कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळेच्या आवारात करण्यात येणार आहे.

सदर प्रदर्शनात जातीवंत म्हशी, संकरित गाई व गीर गाय यांना प्रवेश देण्यात येणार असून स्पर्धेत भाग घेतलेल्या जनावरांमधून प्रथम,द्वितीय व तृतीय बक्षिसे निवड करून देण्यात येणार आहेत. पशुपालकांनी जवळच्या पशु वैद्यकीय दवाखान्यात तसेच सकाळी १० वाजेपर्यंत कार्यक्रम स्थळी नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.





