सामाजिक कार्यात अग्रेसर उमेदवार असल्याने मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद…
अमळनेर:- पू सानेगुरुजी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत तुषार बोरसे यांच्या सर्व समावेशक अशा सहकार पॅनल मधील उमेदवारांचे मजबूत संघटन आणि सोबत केलेल्या कार्याची जोड यामुळे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सहकार पॅनलला सर्व जागांवर उमेदवार मिळाले आणि सर्व उमेदवार हे विविध क्षेत्रात काम करणारे, सामाजिक काम करणारे असून शिक्षक आणि विद्यार्थी हितासाठी झगडणारे असल्याचे अनेकवेळा मतदारांना दिसून आले आहे. तसेच पॅनल प्रमुख तुषार बोरसे यांचे सातत्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी असलेले कार्य, मोठेपणा अथवा बढेजाव पणा न करता निस्वार्थी सेवा यामुळे सहकार पॅनल कडे बघण्याचा मतदारांचा सकारात्मक दृष्टिकोन, उमेदवार निवडताना एकाच गटातील नव्हे तर मुख्याध्यापक , ज्युनियर कॉलेज, माध्यमिक शिक्षक, आश्रमशाळा, खाजगी प्राथमिक, शिक्षकेतर कर्मचारी लिपिक, ग्रंथपाल अशा सर्व विभागाना न्याय देऊन मातब्बर उमेदवार निवडण्यात आले आहेत. आणि विद्यमान संचालकातील जेष्ठ मंडळीने देखील पाठिंबा दर्शवला आहे. प्रचार करताना खोटे न बोलता अभ्यासपूर्ण मांडणी, प्रकाशक म्हणून सर्व संघटनांना प्राधान्य या सर्व बाबी पतपेढीच्या मतदारांना चांगल्याच भावल्या आहेत. कदाचित यामुळेच सहकार पॅनलच्या सर्व उमेदवार निवडीचा निर्धार आणि ध्यास मतदारांनी घेतला असल्याचे ठिकठिकाणी मिळत असलेल्या पाठिंब्यावरून दिसून येते. विशेष म्हणजे नवीन मात्र कर्तृत्ववान,अनुभवी उमेदवार दिले असल्याने टीका आणि प्रतिप्रश्न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या पॅनल मधील प्रत्येक उमेदवार कुठे ना कुठे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी धडपड करणारा मदत करणारा आहे याची खात्री सभासदांना झाली आहे. म्हणूनच मतदारांची गर्दीच विजयाचे आश्वासन देत आहेत.