
अमळनेर:-येथील सुवर्णकार समाजाचे सामजिक कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त विमा अधिकारी सतिश लक्ष्मण मुंडके व निवृत्त कलाशिक्षक दिलिप मार्तंड दाभाडे या दोघांची भारतीय नरहरी सेना (महाराष्ट्र राज्य)च्या प्रदेश कार्यकारिणीवर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

पंढरपूर येथे नुकत्याच झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या सभेत संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुराडे व प्रदेश अध्यक्ष डॉ. राजेंद्र पिंगळे अमळनेर यांनी सदरची निवड केली आहे. सदर बैठकीला प्रदेश सरचिटणीस राजेश पंडित गेवराई, प्रदेश समन्वयक धर्माधिकारी अक्कलकोट,लंकेश बुराडे, संजय सोनार बुलढाणा, अमोलजी पोतदार अक्कलकोट आदी उपस्थित होते.या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.





