अमळनेर:- शहरातील मराठा मंगल कार्यालयात १७ रोजी दुपारी एक वाजता तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा मेळावा होणार आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन नामदार अनिल भाईदास पाटील करणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दादाभाऊ काकडे पाटील हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार स्मिता उदय वाघ,डॉ. बी. एस.पाटील, कृषीभूषण साहेबराव पाटील, शिरीष हिरालाल चौधरी यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी ऍड विकास जाधव,आनंद जाधव, आबासाहेब सोनवणे, जे. डी टेमगिरे, राजमल भागवत, सुषमा देसले, बाळासाहेब धुमाळ, श्रीकांत पाटील,सुशांत पाटील, गणेश महाजन,प्रशांत पाटील, युवराज पाटील यांचीही उपस्थिती राहणार आहे.यावेळी तालुक्यातील सर्व सरपंच बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अमळनेर सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष महेंद्र शालिग्राम बोरसे, महिला अध्यक्ष शितल महेंद्र पाटील,जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत अरुण पाटील, जिल्हा महिला समन्वयक कल्याणी प्रफुल्ल पाटील, कार्याध्यक्ष कैलास प्रल्हाद पाटील, तालुका उपाध्यक्ष भास्कर आप्पा पाटील व सर्व पदाधिकारी सरपंच परीषद मुबई महाराष्ट्र यांनी केले आहे.
यावेळी नुकत्याच झालेल्या लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच, सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी केले आहे.