
प्रतापच्या श्रमसंस्कार शिबिरात प्रा.डॉ. ललित मोमाया यांचे प्रतिपादन…
अमळनेर:- प्रताप महाविद्यालय स्वायत्त अमळनेरच्या
राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर, चिमणपुरी, पिंपळे येथे बौध्दीक सत्रात प्रा.डॉ.ललित मोमाया यांचे आजचा तरुण, शिक्षण पध्दती व मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर प्रबोधन पुर्ण व्याख्यान संपन्न झाले.

डॉ.मोमाया यांनी मोबाईलची उपयुक्तता, महत्व व फायदे सांगताना त्याच बरोबर त्याचा दुष्परिणाम व मोबाईल अतिवापरामुळे कधीही भरुन न निघणारी हानी यावर प्रकाश टाकला. त्यांनी मोबाईलच्या अती वापरातून होणारे वाईट परिणामांपासून परावृत्त करणारे व प्रेरणादायी विचार व्यक्त केले. सर्व स्वयंसेवकांनी डॉ.मोमाया सरांच्या वक्तव्यातून सखोल अंर्तज्ञानी होणारे व सविस्तर समजणारे विचार घेत आनंद व समाधान व्यक्त करुन सकारात्मक नोंद घेतली. सर्वांनी मोबाईलच्या वाईट सवयी पासून दूर रहावे व कमी वापर करावा, आठवड्यातून 1 दिवस मोबाईलचा अवलंब न करणे यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मचिंतन करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. प्रताप महाविद्यालय स्वायत्तचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन, कार्यक्रम अधिकारी प्रा.हेमंत पवार, प्रा.सुनील राजपूत, प्रा. भाग्यश्री जाधव व सर्व विद्यार्थ्यांचे याकामी सहकार्य लाभले.





