
अमळनेर:- तालुक्यातील झाडी येथे गायरान जागेवर आग लागून २३०० वृक्ष जळून खाक झाल्याची घटना दिनांक १५ रोजी घडली आहे.

याबाबत ग्रामसेवक सुखलाल मालचे यांनी मारवड पोलिसांत फिर्याद दिली आहे. झाडी येथे गायरान जमिनीवर ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०२२-२३ मध्ये जवळपास तीन हजार झाडांची लागवड करण्यात आली होती. दिनांक १५ रोजी सकाळी ११:३० वाजता अज्ञात कारणाने गायरान जमिनीवर आग लागल्याने पाच ते सहा फूट उंचीचे अंदाजे २२०० ते २३०० वृक्ष जळून खाक झाले आहेत. याबाबत मारवड पोलीसात अकस्मात आग लागल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे कॉ सचिन निकम हे करीत आहेत.





