
चेअरमनपदी डॉ. अविनाश पाटील तर व्हा. चेअरमनपदी हभप लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड…
अमळनेर:- सन १९५२ पासून स्थापन झालेल्या पाडळसरे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतची बिनविरोध निवडणूकीची परंपरा कायम ठेवत १२ संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यातुन चेअरमन व व्हा. चेअरमन पदासाठी निवड कार्यक्रम निवडणूक निर्णय सहाय्यक सहकार अधिकारी सुनील महाजन यांच्या अध्यक्षतेखालील काल दिनांक १६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली. त्यात चेअरमन पदासाठी डॉक्टर अविनाश मुकुंदास पाटील तर व्हा चेअरमन पदासाठी हभप लक्ष्मण बुधा पाटील यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने अध्यासी अधिकारी सुनील महाजन यांनी चेअरमनपदी डॉक्टर अविनाश पाटील तर व्हा. चेअरमनपदी हभप लक्ष्मण बुधा पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केली.

बहुतांश नवनिर्वाचित संचालक मंडळात मंत्री अनिल पाटील यांचे समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याने पाडळसरे विकास सोसायटीवर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा रोवला गेला आहे. त्यात संचालक म्हणून भागवत पाटील, डॉक्टर अविनाश मुकुदास पाटील,हभप लक्ष्मण बुधा पाटील,हभप गोकुळ भिका पाटील, दलीचंद रामकृष्ण पाटील, मंगल एकनाथ पाटील, शांताराम पांडुरंग पाटील, हिम्मत चिंतामण कोळी, मणीलाल दत्तात्रेय पाटील, पिरण बंडू भिल, महिला संचालक पदी जिजाबाई शिवाजी पाटील, वच्छलाबाई गोकुळ पाटील यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली, सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच शुभांगी पाटील व उपसरपंच शिवाजी पाटील यांनी सत्कार केला. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय कार्याध्यक्ष पत्रकार वसंतराव पाटील,संजय पाटील, माजी चेअरमन मंगल पाटील, रणछोड पाटील, विश्वास कोळी, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे भुषण पाटील, मधुकर गुर्जर, माजी सरपंच सचिन पाटील, माजी सरपंच रमेश पाटील, सुधाम पाटील ,माजी उपसरपंच रवींद्र पाटील,ईश्वर गुर्जर ,राष्ट्रवादी किसान काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील, माजी व्हाईस चेअरमन यशवंत कोळी,दिपक गुर्जर, रामसिंग कोळी ,बापू अहिरे , हरीश पाटील ,समाधान राठोड, जगदीश गुर्जर ,संदीप गुर्जर आदींनी सहकार्य केले. निवडणूक कामी निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक सहकार अधिकारी सुनील महाजन , संस्थेचे सचिव सुनिल पाटील व कळमसरे सोसायटीचे सचिव सुधाकर पाटील यांनी सहकार्य केले.





