अमळनेर:- चोपडा आगाराची एस टी बस मारवड कळमसरे शहापूर मार्गे नंदुरबार धावणार असल्याचे आगारप्रमुख यांनी सांगितले.
ही बससेवा ता.19 फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी चोपडा आगारातून अमळनेर धार, मारवड, कळमसरे, शहापूर, बेटावद, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा मार्गे नंदुरबार धावणार आहे. सध्यस्थीतीत लग्न सराईच्या पार्श्वभूमीवर ही बस सुरु करण्यात येणार असून प्रवाशांमध्ये आनंद पसरला आहे. यामुळे बऱ्याच प्रवाशांची सोय होणार असून ही बस चोपडा येथून सकाळी ७ वाजता निघेल तर नंदुरबार येथे पोहचण्याची साधारण वेळ ही ११:३० वाजता पोहचेल. तर नंदुरबार हुन बस परत येताना दुपारी १२:३० वाजता निघेल. चोपडा येथे ०४:३० वाजेपर्यंत पोहचेल. यात कळमसरे मारवड येथे नंदुरबार जाताना सकाळी ०८:३० ते ९ वाजेपर्यंत येईल व नंदुरबारहुन चोपडा जाताना दुपारी साडे तीन ते चार वाजेपर्यंत येईल याची नोंद प्रवाशांनी घ्यावी असेही सांगण्यात आले आहे.
ही बस सेवा सुरू करण्यासाठी मारवड येथील ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. तसेच कळमसरे, शहापूर येथील ग्रामस्थांच्या मागणीवरून शहापूरचे सुपुत्र महेंद्र पाटील (आगार व्यवस्थापक चोपडा) यांच्या प्रयत्नांनी 19 फेब्रुवारी पासून चालू होत आहे. त्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.