अमळनेर पोलिसांत पंधरा जणांविरुद्ध दंगलीसह इतर गुन्हे दाखल…
अमळनेर:- शहरातील स्टेशन रोड भागात रागाने का बघतो म्हणून चौघांना मारहाण केल्याने अमळनेर पोलिसांत पंधरा जणांविरुद्ध दंगलीसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १७ रोजी रात्री १० वाजता शहरातील स्टेशन रोड परिसरात सुमित योगेश राजपूत, जयेश परदेशी व लोकेश राजपूत हे उभे असताना पंकज मोहन सातपुते याने रागाने का बघतो असे विचारत त्याचे साथीदार मयूर सातपुते, पंकज सातपुते, कल्पेश सातपुते, भूषण चौगुले, नितीन सातपुते, यश सातपुते, तेजस सातपुते, नरेंद्र सातपुते, यांनी त्यांना मारहाण केली. सुमितचे वडील योगेश मनोहरलाल राजपूत यांनी तिथे पोहचून विचारणा केली असता त्यांना देखील फायटर, कोयत्याने मारहाण करण्यात आली. योगेशची पत्नी ही विनवण्या करत असताना तिला देखील ढकलून दिल्याने तिची पोत तुटून गहाळ झाली. तसेच मोहन सातपुते, दीपक चौगुले, संदीप चौगुले, बाळा चौगुले, अमोल सातपुते, मोहन याची पत्नी, नम्रता सातपुते यांनी देखील शिवीगाळ करून जिवे मारावे यासाठी चिथावणी दिली, अशी फिर्याद योगेश राजपूत यांनी दिली असून याप्रकरणी अमळनेर पोलिसांत दंगलीसह विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ लक्ष्मीकांत शिंपी करीत आहेत.