पाच दिवसीय ‘मिशन साहसी अभियान’ कार्यशाळेचा समारोप संपन्न…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड संचलित, कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व युवतीसभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय ‘मिशन साहसी अभियान’ कार्यशाळेचा समारोप दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास म्हणून प्रा. डॉ. संदीप नेरकर ( सिनेट सदस्य ) हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमास दुसऱ्या प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ.अर्चना पाटील (उद्योजिका अमळनेर ) तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून देविदास शामराव पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.व्ही.डी.पाटील, आय.क्यू. सी. प्रमुख प्रा. डॉ. पवन पाटील तर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ.जितेंद्र माळी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.नाजमीन पठाण तर प्रास्ताविकात विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. जितेंद्र माळी यांनी सदर कार्यशाळा आयोजना मागील विद्यापीठाचा हेतु व उद्दिष्टे सांगून कार्यशाळा विद्यापीठ निर्देशानुसार आयोजित केल्याचे सांगितले. याप्रसंगी कु. कल्याणी पाटील व कु. निकिता वाघ आणि कु. नाजमीन पठाण यांनी पाच दिवसीय कार्यशाळेबद्दल अनुभव कथन केले. प्रमुख अतिथींच्या सत्कारानंतर सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित केले गेले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. डॉ. संदीप नेरकर यांनी मिशन साहसी अभियान कार्यशाळा देण्यामागचा विद्यापीठाचा दृष्टिकोन आणि भूमिका स्पष्ट करीत महाविद्यालयाने सदर कार्यशाळा यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाला धन्यवाद देऊन कौतुक केले, आणि जीवनात विद्यार्थिनींनी या कार्यशाळेत आत्मसात केलेल्या कलागुणांचा वापर करून जीवन यशस्वी करण्याचे आव्हान केले. देविदास शामराव पाटील यांनी सदर कार्यशाळा महाविद्यालयात दिल्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले. सदर कार्यशाळेस मार्गदर्शनासाठी आलेल्या सर्व मान्यवरांना धन्यवाद देऊन विद्यार्थिनींनी जीवनात मोठे होऊन महाविद्यालयाचे नाव उंचविण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे आभार- प्रदर्शन कु.कोमल पाटील यांनी केले.
कार्यक्रमास सर्व महाविद्यालयीन प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.