अमळनेर:- शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला. त्यावेळी शाळेचे सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख पटवून देण्यासाठी विविध भूमिका सादर केल्या, तेव्हा शाळेच्या प्रवेशद्वारापासून घोड्यावर स्वार होऊन येत असलेले शिवाजी महाराज,ढोल ताशे यांनी भारावलेले वातावरण, ठिकठिकाणी सादर होणाऱ्या पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा भगवे वस्त्र हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले सर्व विद्यार्थी -शिक्षक वृंद छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर प्रेम व अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी विविध कार्यक्रमातून शिवाजी महाराजांची जयंती उत्सव साजरी केली. तेव्हा शिवाजी महाराजांच्या कार्याविषयीची ओळख पटवून देणारी भाषणे, पोवाडे,अफजलखानाचा वध, माय मराठी नृत्य इत्यादी कार्यक्रम शिवप्रेमी विद्यार्थ्यांनी सादर केली. शिवरायांनी मराठी माणसाचा कणा ताठ करून सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली त्याचा आदर्श तरुण पिढीने घेतला पाहिजे, असे शाळेतील शिक्षिका प्रतिभा पाटील व सोनाली पाटील यांनी सांगितले. विनोद अमृतकर यांनीही शिवाजी महाराजांच्या कार्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा साळुंखे यांनी केले. कार्यक्रमात सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद उपस्थित होते.