
१ किलोमीटर पर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा
अमळनेर:- येथील बाजार समितीत २० रोजी १० हजार पेक्षा जास्त क्विंटल मालाची आवक झाली असून ३०० पेक्षा जास्त वाहनांच्या लांबच लांब रांगा बाजार समितीच्या बाहेर लागलेल्या होत्या.

अमळनेर बाजार समितीत जळगाव व धुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी आपला शेती माल विक्रीसाठी आणत असतात.१८ व १९ रोजी बाजार समिती बंद असल्याने २० रोजी मालाची आवक वाढली.यात गहू,ज्वारी,मका,हरभरा व इतर धान्याची १० हजार क्विंटल पेक्षा जास्त आवक झाली.
आवक झालेला माल व कंसात मिळालेला उच्चतम भाव
गहू (२५५५),बाजरी (२४००), दादर (४१५५),मका (२१७१) चना (९१७५),हरभरा -गावठी (६०९२),हरभरा -चापा (६०१२), हरभरा -डॉलर सफेद (१३९००) तूर (९४००), सोयाबीन (४३००) या प्रकारे मालाला जास्तीत जास्त भाव देण्यात आला.
अमळनेर बाजार समितीत शेतकऱ्यांना माल विकल्यानंतर रोखीने पैसे दिले जास्त असल्याने शेतकऱ्यांचा कल अमळनेर बाजार समितीलाकडे असतो.




