
अमळनेर:- तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.फेब्रुवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात तालुक्यातील दोन गावात पंचायत समिती मार्फत पाणी पुरविण्यास सुरुवात झाली असून अजून काही गावांमध्ये पाण्यासाठी टँकरची मागणीला सुरुवात झाली आहे.

तालुक्यात ह्यावर्षी पावसाळा असमाधानकारक असल्याचे सांगितले जाते.मात्र पावसाळा होऊन देखील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ न झाल्याने फेब्रुवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.त्यात आंचलवाडी, रणाईचे लोणचारम, शिरसाळे बुद्रुक,तरवाडे,निसर्डी, डांगर बु, गलवाडे बु, सबगव्हाण या गावांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे.तर तरवाडे गावाची लोकसंख्या १२६५ असून जनावरांची संख्या ४०० असल्याने त्याठिकाणी २४ हजार लिटर चे एक व शिरसाळे गावाची लोकसंख्या ४२५ तर जनावरांची संख्या ६२२ असल्याने त्याठिकाणी १२ हजार लिटरचे एक टँकर अशी एक फेरी रोज सुरू आहे.
प्रतिक्रिया…
तालुक्यातील निसर्डी व लोणचारम येथील पण टँकर मागणी प्रस्ताव प्रलंबित आहेत.तर सहा गावात विहिरी अधिग्रहित करण्यात आला आहेत.तर काही गावातील विहिरी अधिग्रहित करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.
:- सुशांत पाटील,गटविकास अधिकारी पंचायत समिती अमळनेर




