अमळनेर:- मारवड मार्गे नव्याने सुरू झालेल्या चोपडा नंदुरबार बसच्या चालक व वाहकाचा मारवड येथे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
१९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी चोपडा आगारातून अमळनेर धार, मारवड, कळमसरे, शहापूर, बेटावद, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा मार्गे नंदुरबार धावण्यास सुरुवात झाली. लग्न सराईच्या पार्श्वभूमीवर ही बस सुरु करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये आनंद पसरला आहे. ही बस सेवा सुरू करण्यासाठी मारवड येथील ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. तसेच कळमसरे, शहापूर येथील ग्रामस्थांच्या मागणीवरून शहापूरचे सुपुत्र महेंद्र पाटील (आगार व्यवस्थापक चोपडा) यांच्या प्रयत्नांनी ही बस सुरू झाली. सकाळी ८:३० वाजता ही बस मारवड पोहचल्यावर चालक शामकांत पाटील, वाहक यादवराव पाटील यांचा शाल व श्रीफळ देत ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जि.प. सदस्य शांताराम पाटील, हरिभाऊ मारवडकर, उपसरपंच भिकनराव पाटील, डॉ. विलास पाटील, प्रदीप चौधरी, रवींद्र साळुंखे, बी. डी. पाटील, दीपक साळुंखे, तुषार साळुंखे, शकील पठाण, हर्षल पाटील, एल जी चौधरी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.