
दूरध्वनीवर संवाद साधत सेंद्रिय शेती, जलसंधारणाविषयी केली चर्चा…
अमळनेर:- मन की बात कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिरूड येथील उपसरपंच कल्याणी पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत सुमारे साडे तीन मिनिटं चर्चा केली.
दिल्ली येथील केशवपूरम या ठिकाणी मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंद्रिय शेती, जलसंधारण याविषयी कल्याणी पाटील यांच्याशी चर्चा केली.त्यात कल्याणी पाटील यांनी रासायनिक खतांचा वापर केल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.तर रासायनिक खतांचा वापर केल्याने विविध आजारांचा सामना माणसांना करावा लागत असल्याने आम्ही दहा प्रकारच्या वनस्पती एकत्र करून सेंद्रिय औषधाची निर्मिती केली असून त्याचा वापर आम्ही शेतीसाठी करतो.त्यासाठी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. सेंद्रिय खत व औषधींचा वापर केल्याने कमी खर्चात उत्पन्नात वाढ झाली आहे.
तर गावात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात होते. ते पाणी जिरविण्यासाठी सर्व शासकीय इमारतींचे पाणी एका ठिकाणी जमा करून ते जमिनीत मुरविण्यात आले आहे.त्यासाठी गावात २० ठिकाणी रिचार्ज शॉफ्टची निर्मिती करण्यात आली असून अजून ५० रिचार्ज शफ्ट मंजूर झाले असून त्याची लवकर निर्मिती करण्यात येणार आहेत. तर गावात तीन गॉडीयन बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.




