अमळनेर:- अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, न्यू प्लॉट परिसर विकास मंच, तसेच जैन सोशल गृप, अमळनेरच्या वतीने दि 25 रोजी आयोजित मोफत हृदयरोग चिकित्सा व मार्गदर्शन शिबिराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला.
सदर शिबिरात धुळे येथील सुप्रसिध्द डॉ. हर्षद डी. सुराणा एम.डी. (मेडिसिन), डी.एन.बी. (कार्डिओलॉजी) तथा कन्सल्टींग इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीस्ट हृदयरोग तज्ञ विनींग हार्ट केअर सेंटर, धुळे यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात संपूर्ण मोफत सल्ला, मार्गदर्शन व उपचार तसेच डायबेटीस , हृदयरोग, रक्तदाब , तपासणी करण्यात आली.याशिवाय अनेकांचा मोफत ईसीजी देखील करण्यात आला. गरजू व निकडीच्या रुग्णांवर सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.सदर शिबिर रविवार, दि.25 रोजी स.10 ते दु.2 वा.दरम्यान सेवा मेडिकल समोर संपन्न झाले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी जैन सोशल ग्रुपचे प्रेसिडेंट देवांग शाह,सेक्रेटरी सौरभ जैन,प्रोजेक्ट चेअरमन उमेश पारख व निखील पारख तसेच सचिन पारेख
आणि पत्रकार संघाचे सदस्य व न्यू प्लॉट परिसर विकास मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
Related Stories
December 22, 2024