
अनेकांचे नळ कनेक्शन केले बंद, मोटारीही केल्या जप्त…
अमळनेर:- येथील नगरपरिषदेच्या वसुली विभागातील भरारी पथकाने वसुली साठी धडक मोहीम सुरू केली असून काल सिंधी कॉलनी भागात विशेष मोहिमेअंतर्गत अनेकांचे नळ कनेक्शन बंद करत पाण्याच्या मोटारी जप्तीची कारवाई करण्यात आली.
सदरच्या मोहिमेत कर अधिकारी रवींद्र चव्हाण, रवींद्र लांबोळे व लिपिक सोमचंद संदानशिव तसेच सतीश बडगुजर, गणेश शिंगारे, गणेश ब्रह्म्हे, निखिल संदानशिव, बाळकृष्ण जाधव,अकील काझी यांच्या भरारी पथकाने मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाने सिंधी कॉलनी भागातून १२ नळ कनेक्शन बंद करून पाण्याच्या मोटारी जप्त केल्या आहेत.अश्याच प्रकारची कारवाई यापुढेही सुरु राहणार असल्याचे मुख्याधिकारी नेरकर यांनी सांगितले असून नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या घरपट्टी व पाणीपट्टीच्या रक्कम त्वरित भरून नगरपरिषदेस सहकार्य करून नळ कनेक्शन बंद तथा जप्ती सारख्या कारवाईचा कटू प्रसंग टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.

