तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याबाबत दिले निवेदन…
अमळनेर:- तालुक्यातील पातोंडा परिसरात वादळी अवकाळी पावसासह गारपीट झालेल्या भागात शेतकरी बांधवांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी निवेदन दिले. तहसीलदार यांच्या वतीने नायब तहसिलदार प्रशांत धमके यांनी निवेदन स्वीकारले.
दि २६ रोजी पातोंडा परिसरात रात्री १० च्या सुमारास प्रचंड गारपीट झाली. यात रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिसरातील गारपीट झालेल्या भागात पंचनामे सुरू तहसीलदार रुपेश सुराणा हे २७ रोजी सकाळीच सदर परिसरात पाहणी करण्यासाठी गेले होते. या परिसरात पातोंडा, दहिवद, दापोरी, जळोद शिवार, खवशी, मुंगसे, सोनखेडी, रुंधाटी, निमझरी, सोनखेडी, मठगव्हान सावखेडा परिसर अर्धा तास गारपीट व तासभर पाऊस झाल्याने गहू, हरभरा, दादर, कांदा, मका यासह विविध रब्बी पिकांचे नुकसान झाले. याचे पंचनामे करावेत यासाठी सकाळीच शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडकले होते. तत्पूर्वी गारपीट झाल्यानंतर रात्रीच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून तात्काळ पाहणी करून पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. यावेळी किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा सुभाष पाटील, राष्ट्रवादी कार्यकर्ते एल टी पाटील, ग्रंथालय सेलच्या अध्यक्षा रिता बाविस्कर, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, संजय पवार, रवींद्र पवार, शालिनी पवार, स्वप्नील पवार, कपिल पवार, मगन पाटील, भरत पाटील, प्रल्हाद बिरारी राहुल लांबोळे, मोहन लांबोळे संभाजी पाटील, रेखा पाटील, देविदास पाटील, आत्माराम पाटील, भिला पाटील, युवराज पाटील, विजय पवार, पांडुरंग बोरसे, रवींद्र बोरसे, अशोक बोरसे, आनंदा बोरसे, दीपक पवार, राजेंद्र पवार, मनोहर पाटील, नामदेव मोरे, भीमराव पवार, वसंत पवार, हेमकांत पवार, हर्षल पवार, राजश्री बाविस्कर, रवींद्र पवार, जयवंत पवार, प्रमिला पवार आदींनी निवेदन दिले आहे.