अमळनेर:- टाकरखेडा ते चावलखेडा दरम्यान रेल्वे लाईन वर ५ मार्च रोजी २५ ते ३० वयोगटातील अनोळखी तरुणाचे प्रेत आढळून आले.
मयताने अंगावर मेहंदी रंगाचे शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट व पायात तपकिरी रंगाची स्लीपर घातलेली होती. या तरुणाला फेकून देण्यात आले की धावत्या रेल्वेतून पडला याबाबत पोलीस शोध घेत आहेत. मात्र तरुणांची ओळख पटलेली नाही. ओळख पटवण्याचे आव्हान पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील व सुनील जाधव करीत आहेत.