
अमळनेर:- शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बडगुजर यांची मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड केली.
प्रशांत बडगुजर यांची अमळनेर शहरात सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात मोलाची कामगिरी आहे. त्यांच्या या निवडीबद्दल नामदार अनिल पाटील ,जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस भूषण भदाणे, तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक जळगाव जिल्हा प्राध्यापक संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटील, गौरव पाटील, पंकज साळी, इमरान खाटीक तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.




