
चुरशीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने मारली बाजी…
अमळनेर:- जळगाव जिल्ह्यात नंबर एकची सहकारी संस्था म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील मंगरूळ विकास सोसायटीच्या चेअरमन पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे विश्वास अभिमन पाटील विजयी झाले.
परिवर्तन पॅनल तथा भाजपाचे भगवान पाटील,जे पी पाटील, राष्ट्रवादीचे दिपक बागुल, भाजपा तालुका सरचिटणीस राकेश पाटील,मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वात चेअरमन पदी विश्वास पाटील विजयी झाले. या निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी झाल्यात,परिवर्तन पॅनलचे ७ सदस्य व विरोधी पॅनलचे ६ सदस्य वेगवेगळे सहलीसाठी चार दिवस सहलीसाठी रवाना झाले होते संपूर्ण तालुक्याचे व पंचक्रोशीचे लक्ष या निवडीकडे लागले होते. निवडणूकीचे कामकाज सुनिल माळी यांनी पहिले.यावेळी सोसायटी सदस्य कैलास पाटील, रणछोड बागुल,विनोद पाटील, घोलप,इंदुबाई पाटील सचिव निरंक पाटील,मनोहर पाटील, वाल्मिक पाटील,भिला पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.




