
वळणावर वाहने दिसत नसल्याने अपघाताची शक्यता…
अमळनेर:- अमळनेर ते फापोरे रस्त्याच्या साईड पट्ट्यावर काटेरी बाभूळ मोठ्या प्रमाणावर वाढले असून प्रवाश्यांना धोकेदायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत आहे.
रात्रीच्या वेळी अनेकदा मोटर सायकलस्वार अंदाज न आल्याने काटेरी झुडूपात गाडी गेल्याने किरकोळ जखमी होत आहे.मागिल महिन्यात आलेल्या बेमौसमी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे काटेरी बाभूळची लहान मोठी झुडपे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाकून गेल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. व रात्रीच्या वेळेस वळणावर समोरून येणाऱ्या मोठ्या वाहनामुळे मोटरसायकल साईटला घेताना काटेरी वृक्षामुळे अडथळा निर्माण होतो व मोटर सायकल चालकाचे अपघात होत आहेत. भविष्यात जिवीत हानी झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न प्रवासी करत असून संबंधित विभागाने त्वरित साईड पट्ट्यांची साफसफाई करावी अशी मागणी केली आहे.




