पक्का रस्ता व खुला भूखंड विकसित करण्याबाबत दिले निवेदन…
अमळनेर:- शहरातील गुरुकृपा कॉलनी गेल्या २५ ते ३० वर्षापासून रस्ते व इतर सुविधांपासून वंचित असल्याने या भागातील सुविधा करण्यात याव्यात अशी मागणी कॉलनी भागातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
प्रभाग १४ मधील गट नंबर १३८९ मध्ये आजूबाजूला दोन ते तीन वेळा रस्ते झाले आहेत मात्र या भागात रस्ते नाहीत. तसेच सर्वत्र खुले भूखंड विकसित झाले आहेत. मात्र या परिसरात खुले भूखंड देखील विकसित झालेले नाहीत. तरी रस्ता पक्का करण्यात यावा व खुला भूखंड विकसित करण्यात यावा अशी मागणी शांताराम वानखेडे, दुर्योधन पाटील, संजय पाटील, पंकज निकम, केशव चव्हाण, राजू पाटील, अभिमन्यू बारी, गुलाब पाटील, नंदकुमार पाटील, मनीष सूर्यवंशी, अनिल चव्हाण, राजेंद्र पवार,सरला भावसार, कल्पना महिरे, प्रशांत अमृतकार, शकुंतला जाधव, बापूराव पवार, शशिकांत सोनवणे, वसंत भोई, अरुण कुढे, वंजी पाटील, जितेंद्र पाटील, अशोक सोनवणे, प्रेमसिंग राजपूत, विनोद पवार, योगेश शिंदे आदींच्या सह्या आहेत.




