
शहरातील बालाजीपुरातील घटना, पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद…
अमळनेर:- छतावर शतपावली करताना तोल जाऊन पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना १२ रोजी रात्री दहा वाजता बालाजीपुरात घडली.
गजानन रामदास धांडे (वय ४७) हे १२ रोजी जेवण झाल्यानंतर आपल्या पत्नीसह घरच्या दुसऱ्या मजल्याच्या छतावर शतपावली करत होते. त्यांची पत्नी फोनवर बोलत असताना गजानन उलट पावले मागे चालत असताना अचानक तोल जाऊन खाली काँक्रीट रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि पायाला मार लागला. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल संतोष पवार करीत आहेत.




