
अमळनेर:- जागतिक महिला दिनानिमित्ताने आधार बहुउद्देशीय संस्था संचलित महिला समुपदेशन केंद्र, कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन आणि विधीसेवा आयोग- महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने ढेकु गावातील महिला व मुलींसाठी दिनांक 12 मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांची ओवी गाऊन करण्यात आली. गावातील विविध पदांवर असणाऱ्या महिला प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील अलका प्रविण पाटील ह्या होत्या. प्रमुख वक्ते व मार्गदर्शन म्हणून लाभलेले संरक्षण अधिकारी योगिता चौधरी यांनी महिलांना आपले हक्क व कायद्याबद्दल माहिती सांगितली. प्रमुख मार्गदर्शक आधार बहुउद्देशीय संस्थेचा संचालिका श्रीमती रेणू प्रसाद यांनी महिलांना समान हक्क व सन्मान मिळवण्यासाठी तसेच महिला सक्षमीकरण स्त्री पुरुष समानता व स्त्रियांना येणाऱ्या अडचणी, घरातील वातावरणामुळे आपल्या जीवनातील प्रभाव व आपल्या मुलांना योग्य संस्कार अशा विषयांवर मार्गदर्शन केले. व खेळाचा माध्यमातून महिलांचा सहभागाने त्यांना त्यांचे महत्त्व पटवून दिले तसेच आधार संस्थेचे कामाची माहिती दिली. पोलिस पाटील यांनी स्त्रीचे घरातले स्थान व कार्य किती महत्त्वाचे असते यावर मत मांडले. यावेळी उपसरपंच भालचंद्र जाधव व वसंत पाटील हे मंचावर उपस्थित होते. तसेच यावेळी ग्रामपंचायत सदस्या सिमा निलेश पाटील, मंगल वसंत पाटील, बेबाबाई आत्माराम पाटील, पूजा पाटील आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी आधार संस्थेच्या डॉ. भारती पाटील, अश्विनी सूर्यवंशी, दिपक विश्वेश्वर, मुरलीधर बिरारी, तोसिफ शेख, सामाजिक कार्यकर्त्या कुसुम पाटील यांनी सहकार्य केले. आभार सुषमा वाघ यांनी मानले.




