शहरातील बडोदा बँकेजवळ घडली घटना…
अमळनेर:- चार चाकीमध्ये ठेवलेले २० हजार रुपये अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना १२ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बडोदा बँकेजवळ घडली.
मनोज जैन हे चौबारीहून चारचाकी (एमएच १९ सीव्ही ४५७२) ने बडोदा बँकेत आले. त्यांनी २० हजार रुपये बँकेतून काढून पिशवीत गाडीच्या मागच्या सीटवर ठेवले आणि बाजाराला निघून गेले. सायंकाळी पाच वाजता परत आले असता त्यांना पिशवी दिसली नाही. अज्ञात चोरट्याने त्यांचे २० हजार रुपये काढून घेतले. अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल हितेश चिंचोरे करीत आहेत.