
आंचलवाडी येथील घटना, वीस जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- रस्तावर बांधलेली बकरी बैलगाडीला अडथडा निर्माण करीत असल्याने ती बाजूला करा असे सांगण्यावरून सात व इतर २० ते २५ जणांनी माय लेकास मारहाण केल्याची घटना आंचलवाडी ता.अमळनेर येथे घडली असून याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास उर्फ अविनाश ज्ञानचंद पाटील हा २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शेतातून बैलगाडी भिलाटीमधून खळ्यात नेत असताना रस्तावर उभी असलेली बकरी बाजूला करून घे असे पूनम भिल हिस सांगितले. याचा राग आल्याने सुमनबाई प्रताप भिल,प्रताप रामा भिल यांनी त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.तसेच तसेच सायंकाळी निर्मला प्रताप भिल, मुकेश राजू भिल,छोटू पहिलवान, सुनिल भिल, योगेश भिल, (रा.मोहाडी ता.धुळे) यांच्यासह २० ते २५ जण लाठ्या काठ्या घेऊन अंगणात शिवीगाळ करून निघून गेले.दि २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हे सर्वजण घरात घुसून मोठयाने आरोळ्या मारत शिवीगाळ करू लागले. त्यानंतर मुकेश भील याने विमलबाई पाटील यांची साडी ओढत विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.विमलबाई पाटील यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सुमनबाई प्रताप भिल,प्रताप रामा भिल, निर्मला प्रताप भिल,मुकेश राजू भिल,छोटू पहिलवान पूर्ण नाव माहीत नाही,सुनील भिल,योगेश भिल यांच्यासह २० ते २५ जणांवर भादवी कलम ३५४ अ, ४५२,१४३,१४७,१४९,३२३,५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेकॉ संजय पाटील करीत आहेत.




