निम्म्याहून अधिक शहर अंधारात गेल्याने व्यक्त होतोय संताप…
अमळनेर:- वीज बिल थकल्याने महावितरणने शहरातील पथदिव्यांचे विज कनेक्शन कट करून नागरिकांना अंधारात लोटले आहेत. यामुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
नगरपरिषदेचे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे सांगितले जात असताना मूलभूत गरजा असलेल्या पाणीपुरवठा, दिवाबत्ती, यासाठी लागणाऱ्या लाईट बिलाचे पैसे नगरपरिषद थकित करत असून महावितरणाचे सुमारे 54 लाखाची थकबाकी नगरपरिषदेकडे बाकी आहे. मात्र मार्च महिना असल्याकारणाने महावितरणाने वसुली मोहीम चालू केलेली आहे. महावितरणाने परिषदेस पूर्वी लेखी नोटीस तसेच तोंडी सूचना देऊन देखील परिषद लाईट बिल भरण्यास तयार होत नाही. त्यामुळे आज रोजी शहरातील मेन धुळे रोड,चोपडा नाका, तांबेपुरा, भोईवाडा, स्टेशन रोड, भगवा चौक, ढेकू रोड, पिंपळे रोड, यासह शहरातील अनेक भागांचा पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे आजपासून रात्री निम्म्याहून अधिक शहर अंधारातच राहील. यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलणे चालू:- मुख्याधिकारी..
महावितरणाने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केलेला असून 54 लाख रुपये थकबाकी पैकी परवा सहा लाखाचा धनादेश दिला आहे. व सोमवारी ही धनादेश देण्यात येईल. तसेच दर आठवड्याला थकबाकीची रक्कम भरण्यात येईल. शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलणे चालू आहे. :- तुषार नेरकर, मुख्याधिकारी
नगरपालिकेला गांभीर्य नसल्याने विजपुरवठा खंडित…
सुमारे 54 लाख रुपये थकबाकी असल्याने नगरपरिषदेस यापूर्वी वेळोवेळी लेखी नोटीस,व थकबाकी भरण्यास तोंडी सूचना देखील वारंवार करण्यात आल्या असून परिषदेस त्याचे गांभीर्य नसल्याने काल शहरातील काही भागांचे पथदिव्यांचे चे वीज कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. :- टी. एस.नेमाडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण