
मूडी प्र. डांगरी येथील घटना, पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील मूडी प्र. डांगरी येथे २४ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दिनांक १८ रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मूडी प्र. डांगरी येथील २४ वर्षीय दीपक भगवान चव्हाण याने राहत्या घरी मागील खोलीत पंख्याला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. किशोर चव्हाण, प्रफुल पाटील व ग्रामस्थांनी त्यास खाली उतरवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून स्वखुशीने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केल्याची माहिती आहे. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ भरत श्रीराम ईशी हे करीत आहेत.




