नंदगाव येथील घटना, तिघांविरोधात गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील नंदगाव येथे शेळी बांधण्यावरून हाणामारी झाल्याची घटना घडली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील नदंगाव येथे १९ रोजी एक तरुण हा गुरांचा चारा घेऊन घरी आला असता त्यांच्या घराशेजारील कैलास पाटील यांची शेळी तो चारा खात असल्याने त्याने शेळी बांधण्यास सांगितले.त्याचा राग येऊन कैलास पाटील यांनी त्याला व त्याच्या तिन्ही बहिणींना चापटा बुक्यांनी मारहाण केली तसेच मारून टाकण्याची धमकी दिली.
त्या मुलाचे आईवडील हे संध्याकाळी शेतातुन आल्यावर मुलांना झालेल्या मारहाणीचा जाब विचारायला गेल्यावर कैलास पाटील, त्यांची पत्नी रजूबाई व मुलगा उमेश यांनी त्यांच्या कुटुंबाला पुन्हा मारहाण केली तसेच तिन्ही बहिणींचा विनयभंग करून अश्लील शिवीगाळ केल्याने तिघांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पोहेकॉ सुनील पाटील करीत आहे.