
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात उघडकीस आल्याने पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल…
अमळनेर:- ग्रामसेवकाने मोटरसायकल मधील ५० हजार रुपये व कागदपत्रे चोरून नेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात उघडकीस आल्याने पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय कैलास पाटील (रा लोंढवे) हा ठेकेदारीची कामे करीत असतो. त्याने हेडावे येथील काम घेतले आहे. ११ मार्च रोजी विजय पाटील राजभवन जवळ आले असता त्यांच्या मोटरसायकलमधून ५० हजार रुपये व रस्त्याची तांत्रिक मान्यता, मोजमाप पुस्तिका व काही महत्वाची कागदपत्रे गायब झाल्याचे उघडकीस आले. विजय पाटील याने त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहिले असता त्यांना हेडावे येथील ग्रामसेवक जितेंद्र विनायक पाटील याने ११ रोजी ७:५० ते ८:१० च्या दरम्यान दुचाकी (क्रमांक एमएच १९ ए एच ८५२९) वर लावलेली पिशवी मधील कागदपत्रे व पंप हाऊसची ५० हजाराची रक्कम काढून घेतली. त्यांच्याकडे रकमेची वारंवार मागणी करूनही ती रक्कम दिली नाही म्हणून विजय पाटील याने पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून सदर ग्रामसेवकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.




