
कळंबु येथील एकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील कळंबु येथील अंघोळीला बसलेल्या महिलेची लपून मोबाइलमध्ये शूटिंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध मारवड पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २० रोजी सकाळी कळंबु येथील ४५ वर्षीय महिला अंघोळीला बसली असताना घराच्या बाजुला राहणारा संदीप अशोक पारधी हा बाथरूमच्या खिडकीतून लपून मोबाइलमध्ये शूटिंग करताना दिसून आल्याने सदर महिलेने कसेबसे कपडे गुंडाळून बाहेर येवून मुलांना आवाज दिला. तेवढ्यात संदीप हा पळून गेल्याने महिलेच्या मुलांनी त्याचा पाठलाग केला असता तो दुचाकीने कुठेतरी निघून गेला. सदर महिलेच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोकॉ भरत गायकवाड हे करीत आहेत.




