
धुलीवंदनाच्या दिवशी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचा उपक्रम…
अमळनेर:- शहरातील प्रतिष्ठित नागरिक व सदैव हिंदू बांधवांच्या पाठीशी उभे राहुन प्रोत्साहन देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान होळी पौर्णिमा व धुलीवंदनाच्या शुभ दिनी करण्यात आला.
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचा वतीने हा उपक्रम राबविण्यात आला,यानिमित्ताने सकाळीच दोन्ही संघटनांच्या पदाधिकारीनी एकत्रित येत निवड केलेल्या मान्यवरांच्या घरी पोहोचले. सुरवातीला संबंधित मान्यवराच्या अंगावर श्रीरामाच्या गजरात फुलं पाकळ्या टाकून स्वागत करत यानंतर नैसर्गिक रंग लावण्यात आला व शेवटी संघटनेतर्फे एक सन्मानपत्र देऊन निरोप घेण्यात आला.प्रत्येकाने या उपक्रमाचे कौतुक केले.या उपक्रमाअंतर्गत मुंदडा फाऊंडेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा,बजरंगलाल अग्रवाल, सरजू गोकलानी,माजी उपनगराध्यक्ष चंदूसिंग परदेशी,व्यापारी सुनील शेठ,माजी नगरसेवक संजीव कौतिक पाटील,रामदास निकुंभ, माजी जि प सदस्य अँड व्ही आर पाटील,मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले,खा शी मंडळाचे संचालक हरी भिका वाणी, प्रदीप अग्रवाल, गजेंद्र गुंजाळ,खा शी मंडळाचे माजी कार्याध्यक्ष अजय केले, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत इत्यादी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ संजय शाह,दत्ता नाईक,सचिन चौधरी, अमर सोनार, प्रवीण भोई,चंदू कोळी तसेच बजरंग दलचे मनोज मराठे, सचिन महाजन,विशाल पवार, नितेश आमदार, हर्षल ठाकूर,राजेश खराडे, परेश जोशी, विशाल मराठे आदी पदाधिकारीसह कार्यकर्ते उपस्थित होते.सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

