
अमळनेर:- येथील दादासाहेब जी एम सोनार नगर मधील रहिवासी व तळवाडे येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर पाटील यांचे चिरंजीव डॉ. ज्ञानेश पाटील यांनी बीएएमएसची परीक्षा पुणे येथील लोकमान्य टिळक आयुर्वेद कॉलेज शिवाजीनगर येथून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने यावेळी त्यांचा सत्कार मुंदडा नगर व सोनार नगर येथील दुनियादारी ग्रुपच्या सर्व सदस्यांकडून करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवा निवृत्त मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मुख्याध्यापक अर्जुन पाटील उपस्थित होते. यावेळी डॉ. ज्ञानेश पाटील त्यांचे आई वडील यांचा सत्कार करण्यात आला. व्ही. आर. पाटील, अर्जुन पाटील, मुकेश पाटील, गोकुळ पाटील, पंडित सोनगीरे, अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला जिजाबराव माळी, गुलाब शिरसाठ, संजय बागुल, आर टी बागुल,आर बी पाटील, विठ्ठल पाटील, समाधान पाटील, संजय पाटील,शंकरराव बोरसे
कैलास सोनवणे,प्रवीण महाजन, आर एल माळी,डी एस पाटील, विजय माळी, जगतराव पाटील, राजेंद्र शिंपी,रोहिदास देसले, समाधान खैरनार,गजानन माळी, विजेंद्र पाटील,रमेश भावसार,मुरलीधर चव्हाण,एकनाथ निकुंभ, संदीप पाटील,विजय पाटील,रवींद्र सनेर,ए एन पाटील, दिपक पाटील,काशिनाथ पाटील आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हिरालाल पाटील तर आभार सुधाकर पाटील यांनी मानले.




