अमळनेर:- आगामी लोकसभा निवडणूक आणि रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था रहावी म्हणून पोलीस प्रशासनातर्फे रूट मार्च काढण्यात आला.
सामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी आणि गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक बसावा म्हणून शहरातील संवेदनशील व वर्दळीच्या भागातून रूट मार्च काढण्यात आला.
डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या नेतृत्वाखाली मारवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साळवे, पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख, उपनिरीक्षक नामदेव बोरकर, उपनिरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक वसावे, बीएसएफचे अधिकारी व कर्मचारी असे ८ अधिकारी,५० पोलीस कर्मचारी , ३० होमगार्ड व ३० बीएसएफ जवान सहभागी झाले होते.
गांधलीपुरा पोलीस चौकी, पाचकंदील चौक, शेतकीसंघ, गांधलीपुरा कॉलनी,मेहतर कॉलनी, गरीब नवाज चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजार, वाडी चौक, कसाली डीपी, माळीवाडा, झामी चौक, मंगलादेवी चौक, पवन टी सेंटर, राजहोळी चौक, पानखिडकी, जिनगर गल्ली, आडवा सराफ बाजार, तिरंगा चौक, पाचपावली मंदिर व अखेरीस एक नंबर शाळेत समारोप करण्यात आला. तसेच रात्री पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची घरे तपासली व नाकाबंदी करण्यात आली.