मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने कसली कंबर…
अमळनेर:- मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध संघटना व बचत गटांसोबत बैठका संपन्न झाल्या.
दिनांक ३१ रोजी नगरपरिषदेतील सभागृहात शहरातील सर्व बचत गटाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बैठक सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीत सर्व बचत गटातील सर्व सदस्यांनी शंभर टक्के मतदान करावे व आपल्या बचत गट भागातील महिलांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे असे आवाहन करण्यात आले. सर्व उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात आली.
त्यानंतर शहरातील विविध असोसिएशन व संघटना यांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीत सर्व संघटना यांनी 100% मतदान करावे व आपल्या संघटनांचे पदाधिकारी, त्यांचा परिवार यांना देखील मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे असे आवाहन करण्यात आले. सर्व उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात आली. सदर बैठकीस रुपेशकुमार सुराणा, तहसिलदार अमळनेर, प्रशांत धमके निवडणूक नायब तहसिलदार, तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.