अमळनेर:- येथील समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दौरा सातपुडा पर्वतरांगांमध्ये नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव, तोरणमाळ आणि नर्मदा नदी खोऱ्यातील आदिवासी वस्ती वस्ती मधील कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या विविध उपक्रमांना भेटीतून झाली.
नंदुरबार येथून पिरामल फाउंडेशन,जनसाहस संस्था, जिल्हा बाल सहाय्य कक्ष, व्यसनमुक्ती केंद्र तसेच अक्कलकुवा येथील आदिवासी गावांमध्ये पारंपारिक होळी महोत्सव यामध्ये सहभागी होऊन होळीचा आनंद घेतला. टाटा ट्रस्ट सिनी या व इतर संस्था, यंग फाउंडेशन धडगाव येथे विविध संस्थांना भेटी देऊन आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढी साठी लखपती किसान प्रकल्पास समक्ष भेटी देऊन अभ्यास केला.
संपूर्ण सातपुडा पर्वतरांगांमध्ये विविध पाड्यांवर होळीचा प्रचंड उत्साह दिसून आला. तोरणमाळ व त्याखालील परिसरात नर्मदा नदी पात्रामध्ये व परिसरात कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या जीवन शाळा प्रकल्पास भेटी दिल्या. सदर शैक्षणिक दौऱ्यात समाजकार्याच्या विद्यार्थ्यांसह प्रा.विजयकुमार वाघमारे प्रा. डॉ. जगदीश सोनवणे यांनी सहभाग दिला. सातपुडा पर्वत रांगेतील दुर्गम भागात भेट देणारे अमळनेरचे समाजकार्य महाविद्यालय हे पहिले समाजकार्य महाविद्यालय आहे अशी भावना येथील संस्थांच्या प्रतिनिधींनी बोलून दाखवून महाविद्यालयाचे कौतुक केले. संस्थेचे संचालक अभिजीत भांडारकर, डॉ.पी एस पाटील यांनी विद्यार्थी व प्राध्यापक यांचे कौतुक केले.