
पुरुषांमध्ये रामदास वडर, महिलांमध्ये मनीषा गावित यांनी पटकावला प्रथम क्रमांक…
अमळनेर:- महसूल विभागातर्फे आयोजित मतदान जागृती मॅरेथॉन स्पर्धेत पुरुषांमध्ये रामदास वडर याने तर महिला गटात मनीषा गावित हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. सर्वात वयोवृद्ध १०१ वर्षाच्या मतदार आटाळे येथील लाडकाबाई रामचंद्र अहिरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
२ एप्रिल रोजी जिल्हापरिषद विश्रामगृह ते धुळे रोडवरील अमळनेर प्रवेशद्वार पर्यंत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील पुरुष गटातील प्रथम विजेते रामदास वडर, पुरुष गटातील द्वितीय कृष्णा गायकवाड, तृतीय राहुल पावरा, महिला गटातील द्वितीय शिल्पा हयाळीज, तृतीय राजश्री देशमुख तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक विकास देवरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील,जेष्ठ मतदार वसंतराव पाटील,पुरवठा निरीक्षक संतोष बावणे हजर होते.
स्पर्धेत तालुका क्रीडा समन्वयक सुनील वाघ, कार्याध्यक्ष संजय पाटील, युवा क्रीडा अध्यक्ष निलेश विसपुते, सचिन पाटील, जयेश म्हासरे, कमलेश मोरे, विलास चौधरी, प्रशांत वंजारी,सॅम शिंगाणे, कैलास बाविस्कर, बिऱ्हाडे, रोहन मुंदडा, प्रशांत धमके, शिरीष सैंदाने, नितीन ढोकणे,जगदीश पाटील, स्वप्नील कुलकर्णी , वैशाली पाटील, प्रितेश तुरणकर यांच्यासह १८ वर्षावरील अनेक मतदार सहभागी झाले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, सिद्धांत शिसोदे, अमोल पाटील, नपा मुकादम नितीन बिऱ्हाडे तसेच महेंद्र पाटील, जयवंत ढवळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार संजय पाटील यांनी मानले.




