
गेल्या २५ वर्षांपासून १०० टक्के वसुलीची परंपरा कायम…
अमळनेर:- तालुक्यातील शिरूड येथील विवीध कार्यकारी सोसायटीची मार्च अखेरपर्यंत १०० टक्के कर्ज वसुलीची परंपरा कायम ठेवली असून ह्या वर्षी देखील विकासोची मार्च अखेर पर्यंतची कर्जवसुली १०० झाली आहे.
शिरूड विकासोने ह्या वर्षी २ कोटी ५२ लाख रुपयाचे वाटप शेतकऱ्यांना वाटप केलेले होते. त्यानुसार मार्च महिन्याअखेर वाटप झालेल्या पूर्ण रकमेचा भरणा बँकेत झाल्याने संस्थेच्या खात्यात १५ लाख रुपये जमा झाल्याने गेल्या २५-३० वर्षांपासून १०० टक्के वसुलीची परंपरा सोसायटीने कायम ठेवली आहे.यासाठी संस्थेचे चेअरमन मिराबाई पाटील,व्हाईस चेअरमन अनंतराव मोरे, कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रा.सुभाष पाटील बापूराव महाजन,अरुण पाटील, सीताराम पाटील,भास्कर पाटील, धोंडू पाटील,सुभाष महाजन, वासुदेव पाटील,गोरख धनगर, तिलोत्तमा पाटील,सविता पाटील सचिव रवींद्र पाटील,विरभान पाटील, राजू मोरे, जिल्हा बँकेचे शेषराव पाटील व व्ही.बी. सोनवणे आदींनी सहकार्य केले.




