
अमळनेर:- धुळ्याहून अमळनेरकडे दुचाकीवरून येत असताना जानवे गावाजवळ सायंकाळी सहाच्या सुमारास ट्रकने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडली आहे.
या अपघातात अरमान शाह कमाल शहा (वय 65) याचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाल्याची माहिती आहे. शहरातील शाहआलम नगर येथील रहिवासी अरमान शाह कमाल शाह हे धुळ्याहून जवळच्या नातेवाईकाला भेटून अमळनेर या गावी जात असताना जानेवे गावाजवळ सायंकाळी सहाच्या सुमारास लोखंड भरलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. फरफटत नसल्याने गंभीर जखमा झाल्यामुळे अरमान शहा याचा जागीच मृत्यू झाला.त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला असता तेथे त्याच्या कुटुंबीयांची व लोकांची गर्दी झाली होती. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाल्याची माहिती मिळाली असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.




