
अमळनेर:- तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिमणपुरी पिंपळे खुर्द यांच्यातर्फे रखरखत्या उन्हात गावातील ग्रामस्थांसाठी व वाटसरूसाठी थंड पाण्याची सुविधा बस स्टॉप वरती परिसरात केली आहे.
या आरओ फिल्टरचे उद्घाटन पाणपोईचे उद्घाटन परम पूज्य भरत पुरी महाराज, तंटामुक्त अध्यक्ष निंबा चौधरी जयवंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी याप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये ठराव करण्यात आला की, ज्या लोकांची घरपट्टी व पाणीपट्टी निल असेल त्या लोकांना पाच रुपयात 15 लिटर पाणी देण्यात येईल व ज्या लोकांकडे थकबाकी असेल त्या लोकांना दहा रुपयात 15 लिटर पाणी देण्यात येईल. यावेळी लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील व उपसरपंच शोभा गोकुळ पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी, अरुण पाटील, जयश्री पाटील, मीना पाटील, लोटन भिल, ग्रामसेवक किरण लंकेश, ग्रामपंचायत शिपाई ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, गोकुळ पाटील, निंबा चौधरी, भगवान पाटील, सुदाम पाटील, आबा पाटील, राकेश चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.




